भुईमुगाचे उत्पादन वाढविण्यासाठी रिकाम्या ड्रमचा वापर
Uploaded 5 months ago | Loading
10:07
स्व-परागीकरण झालेली फुलं वाळतात आणि खाली जमिनीच्या दिशेने वाढणारी सुईसारखी रचना तयार करतात. याला "आऱ्या" म्हणतात. जेव्हा या आऱ्या यशस्वीपणे जमिनीत घुसतात, तेव्हा शेंगा तयार होतात. भुईमुगाचे उत्पादन हे जमिनीमध्ये प्रवेश करणाऱ्या आऱयांच्या संख्येवर अवलंबून असते. पिकावर ड्रम फिरवल्याने फांद्या जमिनीवर पसरतात. यामुळे फांद्यांच्या वरच्या भागातील आऱयांना जमिनीत प्रवेश करणे शक्य होते.
Current language
Marathi
Produced by
Atul Pagar, WOTR