दुभत्या गायींमध्ये कॅल्शियमची कमतरता
Uploaded 1 month ago | Loading
15:29
जास्त दूध देणाऱ्या गायींमध्ये कॅल्शियमची कमतरता सर्वसाधारण असते. कॅल्शियमची कमतरता असलेल्या गायीला जास्त भूक लागत नाही, तिचे शरीर थंड पडते, ती थकलेली दिसते आणि उभी राहू शकत नाही. ती कमी दूध देते. उपचार न झाल्यास गायीचा मृत्यू होऊ शकतो. कॅल्शियमची कमतरता टाळण्यासाठी, तुमच्या गायींचे शिंगं कापू नका. थंड वातावरणात गायींना काही काळ सूर्यप्रकाश मिळू द्या, त्यामुळे त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन D तयार होईल आणि अधिक कॅल्शियम शोषले जाईल. गायींना कॅल्शियमयुक्त चारा, मका चारा आणि झाडांची पाने खाऊ घाला. त्यांना पिण्याच्या पाण्यातून किंवा खाद्यातून खनिज मिश्रण द्या. दूध काढल्यानंतर प्रत्येक गायीला एक टोपली भरून हिरवे गवत खाऊ घाला. व्हिडिओमध्ये इतर अनेक उपयुक्त सूचना दिल्या आहेत.
Current language
Marathi
Produced by
Green Adjuvents