कोंबड्यामधील देवी रोगाचा प्रतिबंध आणि नियंत्रण
Uploaded 6 months ago | Loading

0:00
देवी रोग हा कोंबड्यांच्या डोक्यावर आणि डोळ्यांवर जास्त परिणाम करतो त्यामुळे त्यांना तेथे फोडी येतात आणि ताप येतो. त्यांच्या डोळ्यांजवळील फोडांमुळे त्यांना त्यांचे अन्न शोधणे आणि खाणे कठीण होतेज्यामुळे अनेकदा मृत्यू होतो. कोंबड्या हे फोड आपल्या पायाने ओरबाडतात त्यामुळे जखमा जास्त चिघळतात आणि रोग वाढतो. खुराड्यात कोंबड्यांची जास्त गर्दी टाळून कोंबड्यांची शेड स्वच्छ ठेवून आणि नैसर्गिक घटकांच्या मदतीने तुमच्या कोंबड्या निरोगी राहतील आणि अधिक अंडी देतील.
Current language
Marathi
Produced by
Atul Pagar, ANTHRA