भुईमुग पिकावरील टिक्का रोगाचे व्यवस्थापन
Uploaded 5 months ago | Loading
14:09
टिक्का रोगास कारणीभूत असलेली बुरशी हि जमिनीत आणि भुईमूग पिकाच्या अवशेषांवर राहते. पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा किंवा स्यूडोमोनास पावडर शेणख मध्ये मिसळून शेतात पसरवा. बियाण्यांना ट्रायकोडर्मा किंवा स्यूडोमोनास पावडर ने प्रक्रिया करा. रोगाचा वाऱ्याद्वारे होणारा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी, भुईमूग पिकाच्या मध्ये जास्त उंचीचे दुसरे एक पीक घ्या. शेतात पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्या. जर तुमच्या शेतात टिक्का रोगाचा प्रादुर्भाव झाला तर ट्रायकोडर्मा किंवा स्यूडोमोनासच्या द्रावणाने पिकावर फवारणी करा. किंवा गोमूत्र, आंबट ताक आणि गूळ पाण्यात मिसळून, संपूर्ण पिकावर फवारण्यासाठी हे द्रावण वापरा.
Current language
Marathi
Produced by
Atul Pagar, WOTR