फळबागेतील विणकर मुंग्यांची संख्या वाढवणे
Uploaded 5 months ago | Loading

12:59
Reference book
विणकर मुंग्या तुमच्या फळांचे आणि मेव्याचे फळमाश्या आणि इतर अनेक कीटकांपासून पासून संरक्षण करण्यासाठी मदत करतात. जर अजूनही तुमच्या फळबागेत विणकर मुंग्या नसतील, तर मुंग्यांच्या एखाद्या वसाहतीतून सर्व घरटी जमा करा आणि ती तुमच्या फळझाडांवर पुन्हा तयार करा. एखादी दोरी किंवा काठी वापरुन मुंग्यांना आणखी झाडांवर त्यांची संख्या वाढवण्यासाठी मदत करा. जर शेजारच्या झाडांवरील मुंग्या भांडत असतील, तर त्या वेगवेगळ्या वासहतीतील आहेत आणि त्या वेगळ्या करायला हव्यात. अशा दोन झाडांना जोडणाऱ्या फांद्या कापून टाका. फळे काढताना तुमच्या संपूर्ण हातांवर आणि पावलांवर इतर लोक किंवा तुम्ही ज्या फांदीवर चढणार आहात, त्यावर थोडीशी राख टाका.
Current language
Marathi
Produced by
Agro-Insight