नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या रानभाज्या
Uploaded 1 month ago | Loading
14:46
वनजमिनी, लागवड न झालेली सामुदायिक आणि गावाची जमीन, तसेच जलाशय हे अन्न मिळवण्यासाठी महत्त्वाचे स्रोत म्हणून वापरले जातात. अनेक रानभाज्या अत्यंत पोषक असतात, तर काहींमध्ये औषधी गुणधर्मही असतात. भित्तिपत्रकं, रानभाज्यांचं वेळापत्रक, सूची आणि स्थानिक भाषांमध्ये पाककृती पुस्तिका तयार करू शकता. स्थानिक शाळांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करा, मुलांना या रानभाज्यांची ओळख करून द्या आणि शालेय प्रशासनाबरोबर काम करून त्यांना आरोग्यास हानी पोहोचवणाऱ्या, प्रक्रिया केलेल्या अन्नांपासून दूर ठेवण्यासाठी सहकार्य करा. या रानभाज्या शाश्वत पद्धतीने कश्या गोळा करता येतील हे शिकावे. गावाजवळील पडिक जमिनीवर काही रानभाज्यांची वाढ होऊ शकते का हे शोधावे.
Current language
Marathi
Produced by
Atul Pagar, AWARD