नैसर्गिक पद्धतीने कोंबड्यांची निगा कशी राखावी

अस्वच्छ पिण्याचे पाणी, अस्वच्छ परिसर आणि अयोग्य खाद्य यामुळे कोंबड्यांना अनेक आजार होतात. कोंबड्यांचे खुराडे दररोज स्वच्छ करा त्यातील विष्ठा आणि खराब झालेले खाद्य दररोज साफ करा. तुम्ही कोंबड्यांचे पिण्याचे पाणी हळद पावडर किंवा पोटॅशियम परमॅंगनेट चा वापर करून शुद्ध करू शकता. कोंबड्यांना संतुलित आहार द्या. कोंबड्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खाद्यामध्ये चिरलेला लसूण किंवा कांदा घाला. कडू औषधी वनस्पतींची पाने परोपजीवी रोखण्यास मदत करतात. जंत होऊ नये म्हणून किंवा जंत कमी करण्यासाठी पपईचा चीक, सुपारी किंवा डाळिंबाच्या फळाच्या सालाचा वापर करा. कॅल्शियमच्या कमतरतेपासून बचाव करण्यासाठी कोंबड्यांना अंड्याच्या कवचाची पावडर किंवा ओला चुना देऊ शकता. कोंबड्यांच्या खुराड्यात तीव्र गंध असलेल्या पानांचा एक छोटा गुच्छ बांधा त्यांचा तीव्र वास परोपजीविंना दूर ठेवेल.

Current language
Marathi
Available languages
Need a language?
If you would like this video translated into other languages, please contact kevin@accessagriculture.org
Uploaded
3 weeks ago
Duration
13:40
Produced by
Atul Pagar, ANTHRA